Saturday, April 19, 2014

 उघड्या बोडक्या टेकडीवर
 उतरून आलं आहे
 धूर  भरलं आभाळ

अनंत ढवळे

Saturday, April 12, 2014

हायकू

मन मोठं कर
हे सांगत  घोंघावताहे
शिशिरातला सर्द वारा

अनंत ढवळे

Tuesday, April 1, 2014


 मध्यरात्रीचे हायकू


अर्थहीन झाल्यात
बहुतेक गोष्टी
रस्ते, दिवे, ही मध्यरात्र

**

कुणाला बोलावताहेत
या उन्हाळ मध्यरात्री
झाडांच्या विरक्त सावल्या

अनंत ढवळे



Thursday, January 16, 2014

कोकणातले हायकू २


पांढरी वाळू
निळा समुद्र
कष्टाने काळवंडलेले लोक...

अनंत ढवळे

Monday, January 13, 2014

कोकणातले हायकू

कोकणातली उदास संध्याकाळ
माडांपलीकडून
समुद्र घोंघावतोय

अनंत ढवळे

1

 Omar Khayyam taught us not to burn our moments mourning the dead for they sleep peacefully  in their cold graves. Strange fellow, he was, O...