Tuesday, July 8, 2025

1

एवढ्या लवकर 
उजळून आलंय आभाळ 
हे देखील ठीकच 

-
अनंत ढवळे 

1

उंच इमारतीच्या 
मागचे निळसर आभाळ
समुद्रासारखे खोल 


-

अनंत ढवळे 

1

पाच वाजताच्या 
सूर्योदयासोबत पक्षांची किलबिल
ऐकत बसणं 

-

अनंत ढवळे 

Wednesday, April 23, 2025

1

स्वप्नात उठून बसलो
आता प्रश्न पडलाय - हे खरंय 
की ह्या आधी पाहिलेलं  
 
.. 
अनंत ढवळे 

Tuesday, April 22, 2025

1

आपण लवकरच 
विसरून बसूत ही बर्फ-वादळे
स्थळकाळाच्या आदिम झपाट्यात  
 
.. 

अनंत ढवळे 

1

जाणिवेची बोट
मौसमी वादळ-वारे झेलून
जुनी पुराणी झालेली 
 
.. 
अनंत ढवळे 

1

मेट्रोतल्या मुलीकडे 
रेंगाळून बघताहेत उन्हाचे कवडसे 
ओशाळल्यासारखे, आशाळभूत 

.. 
अनंत ढवळे 

1

एवढ्या लवकर  उजळून आलंय आभाळ  हे देखील ठीकच  - अनंत ढवळे