Tuesday, January 19, 2016

1

आपलीच उदासी
भिरभिरते आहे, दुपारच्या
उन्हाळ वावटळीत

--
अनंत ढवळे 

Friday, January 8, 2016

हायकू

खिडकीच्या गजांमधून
काचेच्या पटातून
उजेड निथळतो कुठून कुठून

अनंत ढवळे


1

जंगलांच्या आठवणीत बाल्कन्यांमध्ये रमलेले लोक रोपांइतकेच समजदार  . अनंत ढवळे