Thursday, April 23, 2026

1

एकसाथ हलू लागलेत 
गुप्त संदेशातनं आदेश मिळाल्यासारखे   
हजारो झाडमाथे
-
अनंत ढवळे

1

एकसाथ हलू लागलेत 
गुप्त संदेशातनं आदेश मिळाल्यासारखे   
हजारो झाडमाथे

-
अनंत ढवळे

1

जंगले खोल आहेत
गडद हिरवी क्वचित करडी
व्यामिश्र आवाजांची  

-

अनंत ढवळे  


1

जरा डोळे मिटले तर 
निसटून गेली लांब-रुंद दुपार
रात्र म्हटली आलेच मी  
-
अनंत ढवळे 

1

पत्ता विचारणाऱ्या 
तिऱ्हाइतासोबत गप्पा मारत बसलेत
एकाकी उन्हाळ रस्ते

.
अनंत ढवळे   

1

पंख्याच्या भरारा वाऱ्यात 
किणकिणतंय काही सतत 
चहाच्या रिकाम्या कपावर 

-
अनंत ढवळे 

1

पुण्यातल्या ह्या भागात
खुललेला असतो जागोजागी चाफा
हे गाव चाफेपूर असल्यासारखा 

-

अनंत ढवळे 

1

एक बिचारं झाड 
ज्याला वाचवण्यासाठी सरसावले 
शेकडो लोक 


-

अनंत ढवळे

( वॉशिंग्टन डी सी मधलं स्टंपी नावाचं झाड)  

1

दाणे टाकले तर 
येतील का पुन्हा परतून 
कालचे लहानगे पक्षी 

-
अनंत ढवळे 

1

प्रवाळांचे डोंगर बनणे  
फिरणाऱ्या काळाची किमया आहे 
की निसर्गाचा विनोद 

-
अनंत ढवळे 

1

लोक कसे गेले असतील
या एवढ्या मोठया वाळवंटातून
चालत ठेचाळत

-

अनंत ढवळे 

1

अस्वस्थता बनते
रखरखीतपणाचे वाळवंट 
खुरट्या कोरफडी 

-
अनंत ढवळे 

1

समुद्राकाठचे कडे
उभे आहेत तीव्र उतार आणि 
काठिण्य घेऊन 
-

अनंत ढवळे 

1

समुद्राकडे पाहून 
वाटले काही बरेचसे उदात्त
किंचित घाबरवणारे ही 

-
अनंत ढवळे 

1

कल्पनेतली मिठाई 
खाल्ली काय किंवा न 
खाल्ली काय 

..
अनंत ढवळे 



1

एकसाथ हलू लागलेत  गुप्त संदेशातनं आदेश मिळाल्यासारखे    हजारो झाडमाथे - अनंत ढवळे