Saturday, March 1, 2025

1

धूरही गोठून जावा
अशी पडली होती
यंदा थंडी 

..

अनंत ढवळे 

1

अर्धवट पडद्याआडून
डोकावून बघतोय
संधीसाधू सूर्य 

..

अनंत ढवळे 

1

एकसाथ हलू लागलेत  गुप्त संदेशातनं आदेश मिळाल्यासारखे    हजारो झाडमाथे - अनंत ढवळे