Monday, September 26, 2016

पहाटेचे हायकू

पहाटेचे हायकू

++

पहाटेची नीरवता
तांबडं फुटण्याची
आसमंती वेळ

++

दूरवर काही खूडबूड
सुरू होते आहे
दिवसाची लगबग

++

ह्या नंतर सूरू होतील
कितीतरी गोष्टी
दिवसासोबत कलंडत जातील

--

अनंत ढवळे

डब्लीन  (ओहायो)

No comments:

Post a Comment

1

धूरही गोठून जावा अशी पडली होती यंदा थंडी  .. अनंत ढवळे