Saturday, September 29, 2012

अशातले हायकू


1.

थंड बोचरा वारा
मध्येच कुठे पाण्याचा एक ओहोळ
दगडी रस्त्यावर संध्याकाळ उतरलेली

2.

एक वर्ष निघून गेलंय
दाटून राहिलीए
आणखी एक पानगळ

3.

जुने संदर्भ मागे सोडून
निरोप घेताहेत
सप्टेंबरची उन्हे

अनंत ढवळे

1

तळ्याभवतालचं जग  विखरवून टाकत चालली आहे सुसाट एअर बोट  .. अनंत ढवळे