Wednesday, April 29, 2020

हायकू

 पहाडांवर  विखूरलेली उन्हे
 काही  शोधण्याच्या नादात
 भरकटून गेल्यासारखी


--
अनंत ढवळे  

हायकू

विरळ झालेल्या दिवसाची
निर्वैर संध्याकाळ
आवाजांचे विरळ काठ


-

अनंत  ढवळे

हायकू

क्वारंटीन होवून
दुमडून बसले  आहेत
यंदाचे उर्वरित  हंगाम

-
अनंत ढवळे

1

स्वप्नात उठून बसलो आता प्रश्न पडलाय - हे खरंय  की ह्या आधी पाहिलेलं     ..  अनंत ढवळे