Wednesday, January 18, 2023

उत्तररात्रीचे हायकू # 4

आपल्या आत उभी असते
एक अख्खी दुनिया
जी आपण न्याहाळत असतो केवळ


-


अनंत ढवळे 


उत्तररात्रीचे हायकू # 3

हा विचार केला असेल
आपल्याआधी अनेकानी- स्थळकाळावरच्या
किरकोळ ओरखड्यासारखा


-

अनंत ढवळे

उत्तररात्रीचे हायकू # 2

कोण-कोण जागा असेल
मी विचार करतो आहे, ह्या
अनाकलनीय क्षणात


-

अनंत ढवळे

Saturday, January 14, 2023

उत्तररात्रीचे हायकू # 1


ऐन मध्यरात्री तरारून
आलं आहे -  हे लालबुंद
तांबड्या फुलांचं झाड


-


अनंत ढवळे





1

धूरही गोठून जावा अशी पडली होती यंदा थंडी  .. अनंत ढवळे