Tuesday, July 8, 2025

1

एवढ्या लवकर 
उजळून आलंय आभाळ 
हे देखील ठीकच 

-
अनंत ढवळे 

1

उंच इमारतीच्या 
मागचे निळसर आभाळ
समुद्रासारखे खोल 


-

अनंत ढवळे 

1

पाच वाजताच्या 
सूर्योदयासोबत पक्षांची किलबिल
ऐकत बसणं 

-

अनंत ढवळे 

1

तळ्याभवतालचं जग  विखरवून टाकत चालली आहे सुसाट एअर बोट  .. अनंत ढवळे