पाच - सात - पाच सिलॅबल्सचा पारंपरिक फॉर्म मला खूपच तंग वाटतो. त्यापेक्षा कवितेच्या अंगाने जाणारे मोकळे ढाकळे हायकू मला अपेक्षित असलेली दृष्ये आणि क्षण चित्रित करण्यासाठी जास्त सोईचे वाटतात. गेल्या वर्षभरात ह्या ब्लॉगकडे आणि एकंदर हायकू लिहिण्याकडे खूपच दुर्लक्ष झाले. ह्या वर्षात मात्र नेटाने काहीबाही लिहून इथे डोकावण्याचा विचार आहे. अधून-मधून गझलेच्या ब्लॉगवरून इथे भेट देणाऱ्या वाचकांचे पुन्हा एकदा आभार मानणे देखील आवश्यकच !
BY:
मराठी हायकू - अनंत ढवळे /
Marathi Haiku by Anant Dhavale /
アナット・ダヴァレが書いたマラーティー語の俳句anantdhavale@gmail.com
Tuesday, January 9, 2024
Subscribe to:
Post Comments (Atom)
1
स्वप्नात उठून बसलो आता प्रश्न पडलाय - हे खरंय की ह्या आधी पाहिलेलं .. अनंत ढवळे
-
1. थंड बोचरा वारा मध्येच कुठे पाण्याचा एक ओहोळ दगडी रस्त्यावर संध्याकाळ उतरलेली 2. एक वर्ष निघून गेलंय दाटून राहिलीए आणखी एक पान...
-
काय शोधत असावा एकटकी लावून बसलेला पक्षी किनारा, समुद्र, संध्याकाळ ? - अनंत ढवळे
-
शिशिरातले रंग निथळ वर्षावागत निथळत जाणारे - अनंत ढवळे
No comments:
Post a Comment