Thursday, April 7, 2022

नौका

अपरंपार पांढुरके आकाश
खाली एकाकी नौका
समुद्र नेहमीइतकाच अनाकलनीय

-

अनंत ढवळे

वाहणे

झऱ्याचे वाहणे जितके
जुने,  तितकेच आदिम
हे खडक, ही जमीन

-

अनंत ढवळे


Friday, March 11, 2022

अव्याहत

मोठ्या लगबगीने
उगवून येताहेत कार्डामम्स
हे अव्याहतपण, ही उमेद



-


अनंत ढवळे

1

चार दोन दिवसांत
नितळून निघेल बर्फाखालचे
संचित


—



अनंत ढवळे

Thursday, June 4, 2020

1

वार्‍यामागून उरलेल्या
धुळीसारखे संदर्भ ठेवून
निघून गेला आहे आणखी एक दिवस

-

अनंत ढवळे

Friday, May 8, 2020

1

क्वारंटीन झालेल्या रस्त्याकाठी
मध्यम लयीत हलतो आहे
आश्वस्त रिव्हर बर्च

-

अनंत ढवळे

1

जंगलांच्या आठवणीत बाल्कन्यांमध्ये रमलेले लोक रोपांइतकेच समजदार  . अनंत ढवळे