BY: मराठी हायकू - अनंत ढवळे / Marathi Haiku by Anant Dhavale / アナット・ダヴァレが書いたマラーティー語の俳句anantdhavale@gmail.com A non-commercial, literary blog. All rights reserved. Copyright © Anant Dhavale
BY: मराठी हायकू - अनंत ढवळे / Marathi Haiku by Anant Dhavale / アナット・ダヴァレが書いたマラーティー語の俳句anantdhavale@gmail.com
धूरही गोठून जावा अशी पडली होती यंदा थंडी
..
अनंत ढवळे
अर्धवट पडद्याआडून डोकावून बघतोय संधीसाधू सूर्य
दिवस कलंडून जातोय लांबत जाते आहे - न केलेल्या कामांची यादी
**
गोठलेला हिवाळा वितळण्याची वाट बघतोय एक थिजलेलला विचार
--
नक्की कुठवर वाढायचयं हे जाणून आहेत ही अबोल झाडे
काय शोधतोय ध्यानस्थ पक्षी मासे, मैत्री की अजून काही
प्रेमरत दोघांवर खिडकीतून निथळतोय प्रकाशाचा पूर
जंगलांच्या आठवणीत बाल्कन्यांमध्ये रमलेले लोक रोपांइतकेच समजदार . अनंत ढवळे