Thursday, April 23, 2026

1

समुद्राकाठचे कडे
उभे आहेत तीव्र उतार आणि 
काठिण्य घेऊन 
-

अनंत ढवळे 

1

समुद्राकडे पाहून 
वाटले काही बरेचसे उदात्त
किंचित घाबरवणारे ही 

-
अनंत ढवळे 

1

कल्पनेतली मिठाई 
खाल्ली काय किंवा न 
खाल्ली काय 

..
अनंत ढवळे 



Saturday, March 14, 2026

1

तळ्याभवतालचं जग 
विखरवून टाकत चालली आहे
सुसाट एअर बोट 

..
अनंत ढवळे 

Friday, March 13, 2026

1

नंतरचं आभाळ
आधीच्या आभाळाची सहेतुकता
मोजत फिरणारं 

-

अनंत ढवळे

1

एवढी जमावळ
त्यात आप-पर उणे-दुणे
चुकार हिशेब 


अनंत ढवळे 

1

उन्हाळ-धर्मी झोप
तरंगते आहे डोळ्यांवर
अर्धवट मृत्यूसारखी 

.

अनंत ढवळे 

1

जंगलांच्या आठवणीत बाल्कन्यांमध्ये रमलेले लोक रोपांइतकेच समजदार  . अनंत ढवळे