Thursday, June 4, 2020

*

वार्‍यामागून उरलेल्या
धुळीसारखे संदर्भ ठेवून
निघून गेला आहे आणखी एक दिवस

-

अनंत ढवळे

Friday, May 8, 2020

1

क्वारंटीन झालेल्या रस्त्याकाठी
मध्यम लयीत हलतो आहे
आश्वस्त रिव्हर बर्च

-

अनंत ढवळे

Wednesday, April 29, 2020

हायकू

 पहाडांवर  विखूरलेली उन्हे
 काही  शोधण्याच्या नादात
 भरकटून गेल्यासारखी


--
अनंत ढवळे  

हायकू

विरळ झालेल्या दिवसाची
निर्वैर संध्याकाळ
आवाजांचे विरळ काठ


-

अनंत  ढवळे

हायकू

क्वारंटीन होवून
दुमडून बसले  आहेत
यंदाचे उर्वरित  हंगाम

-
अनंत ढवळे

Monday, March 2, 2020

2

भयंकर वाऱ्यात
हेलकावत जाताहेत
झाडांचे टोकदार माथे


अनंत ढवळे 

1

कुठे-कुठे डोकावते आहे
हिरवळ; दुरातल्या
तपकिरी झाडांमधून


अनंत ढवळे 

1

 Omar Khayyam taught us not to burn our moments mourning the dead for they sleep peacefully  in their cold graves. Strange fellow, he was, O...