Wednesday, January 18, 2023

उत्तररात्रीचे हायकू # 4

आपल्या आत उभी असते

एक अख्खी दुनिया

जी आपण न्याहाळत असतो केवळ


-


अनंत ढवळे 


उत्तररात्रीचे हायकू # 3

हा विचार केला असेल

आपल्याआधी अनेकानी

स्थळकाळावरच्या किरकोळ ओरखड्यासारखा


-

अनंत ढवळे

उत्तररात्रीचे हायकू # 2

कोण-कोण जागा असेल

मी विचार करतो आहे

ह्या अनाकलनीय क्षणात


-

अनंत ढवळे

Saturday, January 14, 2023

उत्तररात्रीचे हायकू # 1


ऐन मध्यरात्री तरारून 

आलं आहे 

हे लालबुंद तांबड्या फुलांचं झाड


-


अनंत ढवळे





1

 Omar Khayyam taught us not to burn our moments mourning the dead for they sleep peacefully  in their cold graves. Strange fellow, he was, O...