1.
थंड बोचरा वारा
मध्येच कुठे पाण्याचा एक ओहोळ
दगडी रस्त्यावर संध्याकाळ उतरलेली
2.
एक वर्ष निघून गेलंय
दाटून राहिलीए
आणखी एक पानगळ
3.
जुने संदर्भ मागे सोडून
निरोप घेताहेत
सप्टेंबरची उन्हे
अनंत ढवळे
BY:
मराठी हायकू - अनंत ढवळे /
Marathi Haiku by Anant Dhavale /
アナット・ダヴァレが書いたマラーティー語の俳句anantdhavale@gmail.com
एवढ्या लवकर उजळून आलंय आभाळ हे देखील ठीकच - अनंत ढवळे
छानच !
ReplyDelete