Friday, June 1, 2018

काही हायकू


एकाकी पायवाटांवरून
चालत जाते आहे
दिवसांचे ओलसर सूक्त

++

हात लाऊन बघ
या उष्मतेचा
जिवंत प्रवाह

++

मौज असावी काही
रस्त्याच्या अथाहपणात
दूर जाण्यातली

++

अनंत ढवळे

No comments:

Post a Comment