Sunday, February 25, 2024

1

गोठलेला हिवाळा 

वितळण्याची वाट बघतोय 

एक थिजलेलला विचार  


--

अनंत ढवळे 


1

 नक्की कुठवर वाढायचयं 

हे  जाणून आहेत 

ही अबोल झाडे 


--

अनंत ढवळे 


1

 काय शोधतोय 

ध्यानस्थ पक्षी 

मासे, मैत्री की अजून काही 


--

अनंत ढवळे 

1

प्रेमरत दोघांवर 

खिडकीतून निथळतोय 

प्रकाशाचा पूर 


--

अनंत ढवळे 


Tuesday, January 9, 2024

दूर-दूर अथांगत जाणारा

निळाशार समुद्र

निर्मित्र आणि अनिर्बंध  


-

अनंत ढवळे 

फॉर्म

पाच - सात - पाच सिलॅबल्सचा पारंपरिक फॉर्म मला खूपच तंग वाटतो. त्यापेक्षा कवितेच्या अंगाने जाणारे मोकळे ढाकळे हायकू मला अपेक्षित असलेली दृष्ये आणि क्षण चित्रित करण्यासाठी जास्त सोईचे वाटतात.  गेल्या वर्षभरात ह्या ब्लॉगकडे आणि एकंदर हायकू लिहिण्याकडे खूपच दुर्लक्ष झाले. ह्या वर्षात मात्र नेटाने काहीबाही लिहून इथे डोकावण्याचा विचार आहे. अधून-मधून गझलेच्या  ब्लॉगवरून इथे भेट देणाऱ्या वाचकांचे पुन्हा एकदा आभार मानणे देखील आवश्यकच !

थंडीत गारठल्यासारखे 

रस्त्याकाठचे दिवे 

थिजून बसलेला उजेड - अंधारही 

-

अंनत ढवळे 

Tuesday, January 2, 2024

2

 तावदानावर टकटकी

थेंबांतून क्रमवार 

कलंडणारं आभाळ  

+

अंनत ढवळे 

1

एकटकी लावून बसलेला पक्षी

काय शोधत असावा 

किनारा, समुद्र, संध्याकाळ ?

-

अनंत ढवळे 



1

गोठलेला हिवाळा  वितळण्याची वाट बघतोय  एक थिजलेलला विचार   -- अनंत ढवळे