पाच - सात - पाच सिलॅबल्सचा पारंपरिक फॉर्म मला खूपच तंग वाटतो. त्यापेक्षा कवितेच्या अंगाने जाणारे मोकळे ढाकळे हायकू मला अपेक्षित असलेली दृष्ये आणि क्षण चित्रित करण्यासाठी जास्त सोईचे वाटतात. गेल्या वर्षभरात ह्या ब्लॉगकडे आणि एकंदर हायकू लिहिण्याकडे खूपच दुर्लक्ष झाले. ह्या वर्षात मात्र नेटाने काहीबाही लिहून इथे डोकावण्याचा विचार आहे. अधून-मधून गझलेच्या ब्लॉगवरून इथे भेट देणाऱ्या वाचकांचे पुन्हा एकदा आभार मानणे देखील आवश्यकच !
No comments:
Post a Comment