Tuesday, January 9, 2024

दूर-दूर अथांगत जाणारा
निळाशार समुद्र
निर्मित्र आणि अनिर्बंध  


-

अनंत ढवळे 

फॉर्म

पाच - सात - पाच सिलॅबल्सचा पारंपरिक फॉर्म मला खूपच तंग वाटतो. त्यापेक्षा कवितेच्या अंगाने जाणारे मोकळे ढाकळे हायकू मला अपेक्षित असलेली दृष्ये आणि क्षण चित्रित करण्यासाठी जास्त सोईचे वाटतात.  गेल्या वर्षभरात ह्या ब्लॉगकडे आणि एकंदर हायकू लिहिण्याकडे खूपच दुर्लक्ष झाले. ह्या वर्षात मात्र नेटाने काहीबाही लिहून इथे डोकावण्याचा विचार आहे. अधून-मधून गझलेच्या  ब्लॉगवरून इथे भेट देणाऱ्या वाचकांचे पुन्हा एकदा आभार मानणे देखील आवश्यकच !

थंडीत गारठल्यासारखे
रस्त्याकाठचे दिवे
थिजून बसलेला उजेड - अंधारही 

-

अंनत ढवळे 

Tuesday, January 2, 2024

2

तावदानावर टकटकी
थेंबांतून क्रमवार
कलंडणारं आभाळ  

+

अंनत ढवळे 

1

काय शोधत असावा
एकटकी लावून बसलेला पक्षी
किनारा, समुद्र, संध्याकाळ ?

-

अनंत ढवळे 



1

एवढ्या लवकर  उजळून आलंय आभाळ  हे देखील ठीकच  - अनंत ढवळे