Sunday, October 1, 2017

俳句


マラテ

俳句

समोरच्या चित्रात
मी वगळता
सगळं काही संपूर्ण


++

चित्रातला माणूस
शेतातली पायवाट
एक  निर्वैर बघणं

++
आणखीनच
दूर - दूर होत जातात
दुरातले निळसर डोंगर

++

अफाट शांतता
एक ओंडका  कोसळून पडलेला
बाजूला वेली, काटेरी झुडुपे


++

एवढा अंधार
की दिसतच नाहीए 
पुढ्यातली दरी

++

कुणीतरी कोरून
अर्ध्यात सोडल्यासारखी
ही जंगलवेळ

++

पावसाची लय
 गेल्या दिवसांसारखी
 संथ, सतत


++



मी ऐकत जातोय
पाखरू झपापून गेल्याचा
नुसताच आवाज

++

अनंत ढवळे

No comments:

Post a Comment

1

 Omar Khayyam taught us not to burn our moments mourning the dead for they sleep peacefully  in their cold graves. Strange fellow, he was, O...